फळविक्रेत्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांची नाशिकच्या जेलरोड परिसरातून पोलिसांनी काढली धिंड
E R News Marathi
नाशिक: जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून सर्वत्र फेमस आहे मात्र याच जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी कमी करण्यास पोलिसांना यश येताना दिसून येत नाही. जेलरोड परिसरामध्ये फळ विक्री करणाऱ्या एका फळ विक्रेत्यावर रविवारी रात्री काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणात उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सोहेल सलीम पठाण, अभिजित साळवे, नीलेश क्षीरसागर, आकाश केळे, राहुल हुडेकर आणि प्रेम डोळस यांना अटक केली. त्यांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी आरोपींना दिली त्यावेळी त्यांची पोलिसांनी ज्या भागात फळ विक्रेत्यावर त्यांनी हल्ला केला होता त्या भागातून धिंड काढली.