केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपीस सिया गोयल च्या वडिलांना तुकाराम मुंडेंचा दणका ?
E R News Marathi
पुणे: लोहगडावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी असणारी सिया गोयल हिच्या वडिलांचं पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये असणारे मसाल्यांचे दुकान अन्न व औषध प्रशासन विभागाने सील केले आहे. या दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे मसाले विकत असल्याचा ठपका अन्न व औषध प्रशासनाकडून ठेवण्यात आलेला आहे. या दुकानावर कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल आठ लाख रुपये किमतीचा मसाल्यांचा साठा जप्त केला आहे. तसेच सिया गोयल यांच्या वडिलांना संबंधित व्यवसाय पुढील नोटीस येईपर्यंत बंद ठेवायला सांगितला आहे.