शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
ई आर न्यूज मराठी | नांदेड :
प्रतिनिधी : बालाजी शिंदे
इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बालाजी कदम यांची कन्या कु. आदिती बालाजी कदम हिने नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर आदितीने हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे कदम कुटुंबीयांसह पोलीस विभागातही आनंदाचे वातावरण आहे.
आदितीच्या यशाबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. नीलाभ रोहन यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आदितीच्या यशामागे आई-वडील व कुटुंबीयांचे प्रोत्साहन, संस्कार आणि सातत्यपूर्ण पाठबळ महत्त्वाचे ठरले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.