Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!
  • खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला
  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

सोलापूर

अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!

By E R News Marathi
October 17, 2026 2 Min Read
0Shares
Post Views: 0

अकलूज : सामाजिक सलोखा, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने अकलूज येथे सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नवीन एस.टी. स्टँडजवळील आई श्री रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असून, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

या सोहळ्यास सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राहुल वाघमोडे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार कांगार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत बाबर, संत सावता माळी महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान

समाजातील विविध जाती-धर्मांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करणे, सामाजिक विषमतेविरोधात जनजागृती करणे आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची भावना रुजविण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देण्याचा संघटनेचा मानस आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ वाघमारे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजकुमार लांडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, प्रवक्ते महेंद्र लंकेश्वर, डॉ. विश्वास वाघमारे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, तालुकाध्यक्ष विनोद लोखंडे, युवक जिल्हाध्यक्ष अवि गायकवाड, युवा उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, तालुका सचिव रवींद्र काकडे, तालुका उपाध्यक्ष महमद शेख, अकलूज शहराध्यक्ष अशोक कोळी, युवा जिल्हा उपाध्यक्ष सावता नवगिरे आणि तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

सामाजिक ऐक्य परिषद व कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

0Shares
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!
  • खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला
  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!
  • खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला
  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

Archives

  • October 2026 (1)
  • September 2026 (2)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme