पिलीव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नाना मदने यांचे निवड
E R News Marathi
पिलीव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव मुले शाळेत दिनांक 15/07/ 2026 वार- बुधवार रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करण्यात आले. यावेळी सर्व वर्गातील पालकांनी सहभागी होऊन त्यातून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोधपणे सर्व निवडी पार पडल्या. झालेल्या सदस्यांच्या निवडी मधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याही निवडी बहुमताने करण्यात आल्या. अध्यक्षपदी श्री नाना मधुकर मदने तसेच उपाध्यक्षपदी सौ.अश्विनी वगरे यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून योगेश कृष्णात देशमुख, रघुनाथ नरळे, संतोष बोडरे, सारंग बनसोडे, सचिन मदने व सदस्या म्हणून रेश्मा रवींद्र खामगळ, रुक्सार जुबेर खान पठाण, राजश्री ओंकार जोशी, आम्रपाली सुरज वाघमारे यांच्या निवडी बहुमताने करण्यात आल्या.
निवड झाल्यानंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान शाळेच्या मुख्याध्यापक श्री गोरवे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी केला तसेच सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजू गोरवे सर यांनी सर्वांचे अभिनंदन करून शाळेच्या भरभराटीमध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नूतन पदाधिकाऱ्यांना केले. हे सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात सर्व पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.