तीन लाखांची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षकाला पुण्यात अटक !
E R News Marathi
पुणे: जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस दला अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यातील महिला पी.एस.आय. चैताली गपाट यांनी गुन्ह्यात मदत करून आरोपीवरील आरोपांमध्ये ब फायनल करून दोषारोप पत्र न्यायालयामध्ये न पाठवण्यासाठी नागरिकांकडून आठ लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी नागरिकांनी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला असता 15 तारखेला तीन लाख रुपयांची लाच घेताना या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.