नांदेडमध्ये अवैध वाळू माफियांना पोलिसांचा मोठा दणका! ₹48.16 लाखांचा मुद्देमाल जप्त
ई आर न्यूज मराठी | नांदेड :
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. 27 जुलै 2026 रोजी मोठी कारवाई करण्यात आली.
सुशील जुमडे, पोलीस उपअधीक्षक, कंधार यांच्या विशेष पथकाने कंधार व उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत ₹48.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून जिल्ह्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांवर पोलिसांचा कडक वचक निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.