वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
E R News Marathi
दिल्ली : बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये गेल्या दीड वर्षापासून वाल्मीक कराड हा जेलमध्ये आहे. वाल्मीक कराडचा जामीन अर्ज या अगोदर जिल्हा व सत्र न्यायालयाने, उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे वाल्मीक कराडने देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने वाल्मीक कराडला जामीन देण्यास नकार दिला होता मात्र वाल्मीक कराडने न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी न घेता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने वाल्मीक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाल्मीक कराडला जामीन मंजूर होणार की नाही याविषयी मोठी शंका उपस्थित केली जात आहे..