आषाढी वारी २०२६ : नोडल अधिकाऱ्यांनी फील्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
ई आर न्यूज मराठी | पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर मानाच्या दहा पालख्यांसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. पालखी मुक्काम, विसावा व रिंगणस्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, जर्मन हँगर व फिरत्या शौचालयांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पालखी विश्वस्तांशी दिवसातून किमान तीन वेळा संपर्क ठेवून अडचणी तातडीने सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. यंदा ३० ते ३५ लाख भाविक वारीत सहभागी होण्याची अपेक्षा असून जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा २४ तास सतर्क ठेवली आहे