आषाढी वारी २०२६ : बार्शीत रुक्मिणी माता पालखीचे आगमन
ई आर न्यूज मराठी | बार्शी : आषाढी वारी २०२६ निमित्त मानाच्या श्री विठ्ठल रखुमाई संस्थान, कौंडण्यपूर (विदर्भ) येथील रुक्मिणी माता पालखीचे शुक्रवारी बार्शी शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. वारकऱ्यांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची चोख तयारी केली आहे.