मुलीवर अत्याचार करणारा पोलीस कॉन्स्टेबल अकोला पोलीस दलातून रजा टाकून फरार झाला की फरार केला !
E R News Marathi
अकोला: जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. भाडेकरू म्हणून राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घर मालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी बाळापुर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. पीडित महिलेला सुरुवातीला तिच्या घरामध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मात्र पोलीस कर्मचाऱ्याने लग्नास नकार दिल्याने , तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार !
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संबंधित पोलीस कर्मचारी आरोपी फरार झाला आहे मात्र गुन्हा दाखल झाल्याचे माहित होताच संबंधित कर्मचाऱ्याला वरिष्ठांनी सुट्टी मंजूर कशी केली हा प्रश्न उपस्थित होत आहे ! त्यामुळे अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी फरार झाला की फरार केला अशी चर्चा अकोला जिल्ह्यात रंगली आहे.