हॉटेलमध्ये तोडफोड करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम पुन्हा सेवेत रुजू !
E R News Marathi
पुणे: शहरातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका हॉटेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांनी रात्री तोडफोड केल्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. या वायरल व्हिडिओ नंतर पुणे शहर पोलीस दलाने कदम यांना तत्काळ निलंबित केले होते.
कदम यांच्या निलंबनानंतर चौकशी समितीने केलेल्या चौकशीमध्ये ज्या हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली होती त्या हॉटेलवर या अगोदर सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते या हॉटेलला वारंवार सूचना देऊनही कायदा पाळत नसल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले व त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.