Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

crimeपुणे

करडे गोळीबाराचा थरार ७२ तासांत संपला शिरूर पोलिसांची धडक कारवाई; पाच जण ताब्यात, जुन्या वादातून हल्ल्याचा संशय

By E R News Marathi
July 21, 2026 1 Min Read
1Shares
Post Views: 17

E R News Marathi 

शिरूर | प्रतिनिधी

करडे गावातील गोळीबार प्रकरणात शिरूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळत तपासातील मोठे यश मिळवले आहे. सराईत गुन्हेगारावर भररस्त्यात पिस्तुलातून गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळले आहे. १८ जुलैच्या मध्यरात्री करडे येथील भैरवनाथ मंदिराजवळील तळ्याच्या परिसरात निखिल सतीश थेऊरकर याच्यावर गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून त्याला लक्ष्य केले होते. घटनेनंतर शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली आणि पाच आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचाही सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अथर्व उर्फ टिन्या शेळके, रोहन उर्फ दादया पंचमुख, आदित्य लंघे, निखिल कायस्थ आणि सनी मस्के यांचा समावेश आहे. तपासात हल्ल्यामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे आणि मारहाण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ७२ तासांत आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

1Shares

Tags:

Attempted Murder CaseKardhe Firing CasePune Rural PoliceShirur Police
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
ernewsmarathi
Previous

चित्रपटातील व्हिलन प्रकाश राज बनलाय रिअल हिरो !

Next

बारामतीत एसीबीची धडक कारवाई; वाहतूक नियंत्रक ₹४ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme