संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी; वारकऱ्यांच्या सुविधांवर भर
ई आर न्यूज मराठी | माळशिरस : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्याचे सभापती दत्ता भैय्या मगर यांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. धर्मपुरी ते बोंडले या मार्गावरील विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, वाहतूक नियोजन व वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. वारकऱ्यांना सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.